चंद्रावर अडकलोय मदत करा; पोलीस म्हणाले आमच्या अधिकार क्षेत्रात येत नाही

नांदेड(प्रतिनिधी)-चंद्रावर अडकलोय मला मदत करा अशी मदत ट्विटरवर मागणाऱ्या एका नागरीकाला पोलीसांनी सुध्दा ते आमच्या अधिकार क्षेत्रात येत नाही असे उत्कृष्ट उत्तर देवून दिले. ही सोशल मिडीया पोस्ट खुप लाईक केली जात आहे.हा प्रकार मुंबई पोलीस विभागाचा आहे.
पोलीस विभागाने वेगवेगळ्या सोशल मिडियावर सुध्दा जनतेच्या अडचणींना ऐकण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे कोणताही नागरीक त्रास असेल तर तो पोलीसांना मदत मागू शकतो. त्यासाठी देशभरात 112 क्रमांकावर ही सुविधा उपलब्ध आहेच. सोबतच ट्विटरवर सुध्दा ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. काही घटनांसाठी पोलीसांच्या ईमेलवर सुध्दा आपण तक्रार नोंदवू शकतो, मदत मागू शकतो अशा सुविधा उपलब्ध आहेत.
महाराष्ट्रात मुंबई पोलीस हे जरा हटकेच काम करतात.त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर एका व्यक्तीने संदेश दिला मी चंद्रावर अडकलो आहे आणि मला मदत करा. यावर मुंबई पोलीसंानी सुध्दा खूप छान उत्तर दिले. ते उत्तर असे आहे की, आपण उल्लेखीत केलेला भाग हा आमच्या कार्यक्षेत्रात येत नाही. पण आम्ही चंद्रापर्यंत पोहचू शकतो हा तुमचा आमच्याबद्दलचा विश्र्वास आम्हाला आनंद देणारा आहे. पोलीसांची फिरकी घेत मागितलेली मदत आणि त्यावर मुंबई पोलीसांनी दिलेले उत्कृष्ट उत्तर ही सोशल मिडीयावर सर्वात जास्त लाईक होणारी पोस्ट आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *