जामीनीवर असतांना गंभीर गुन्हे करणाऱ्याला स्थानबद्धता

नांदेड(प्रतिनिधी)-जामीनीवर बाहेर आल्यनंतर एका कैद्याने पुन्हा गंभीर गुन्हे केल्यामुळे त्याच्याविरुध्द स्थानबद्धतेची (एमपीएडी)कार्यवाही करण्यात आली आहे.
नांदेड शहरातील पोलीस ठाणे इतवारा हद्दीत सुदाम उर्फ भुऱ्या दिनाजी जोंधळे याच्याविरुध्द पोलीस ठाणे इतवारा व इतर पोलीस ठाण्यांमध्ये खून करणे, खूनाचा प्रयत्न, खंडणी, दरोडा जबरी चोरी यासारखे गंभीर गुन्हे दाखल होते. एका गुन्ह्यात त्याला शिक्षा झाली. तो शिक्षा भोगत असतांना त्याला जामीन मिळाली. जामीन मिळाल्यानंतर सुध्दा त्याने परत गंभीर स्वरुपाचे गुन्हे केले. त्याच्याविरुध्द वेळोवेळी प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यात आली होती. तरीपण त्याच्या वर्तनात कोणताही फरक पडत नव्हता.तेंव्हा त्या व्यक्तीविरुध्द एमपीएडीचा प्रस्ताव तयार करून जिल्हाधिकारी नांदेड यांच्याकडे सादर करण्यात आला. या प्रस्तावास जिल्हाधिकाऱ्यांनी 30 जून रोजी मंजुरी दिली. त्यानंतर पोलीसांनी सुदाम उर्फ भुऱ्या दिनाजी जोंधळे यास अटक करून औरंगाबाद जिल्हा कारागृहात नेऊन स्थानबध्द केले आहे.
एमपीएडीचा प्रस्ताव तयार करण्यात पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांच्या मार्गदर्शनात इतवाराचे माजी पोलीस निरिक्षक भगवान धबडगे, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर, सहाय्यक पोलीस निरिक्षक राजू वटाणे, पोलीस उपनिरिक्षक आशिष बोराटे, रमेश गायकवाड व गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदारांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *