डॉ.शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय व दवाखाना परिसरातील प्रकार
नांदेड (प्रतिनिधी)-डुकराने चावल्यामुळे एका रुग्णाचा मृत्यू झाल्याचा प्रकार आज सकाळी समोर आला. नांदेडच्या शासकीय रुग्णालय विष्णुपूरी येथे डुकरांचा वावर एवढ्या मोठ्याप्रमाणात आहे की, तेथे रुग्णांना आपल्या आजारासोबत भांडत-भांडत डुकरांसोबत सुध्दा भांडावे लागते. विशेष म्हणजे या परिसरात वर्ग-1 चे अनेक अधिकारी कार्यरत असतांना डुकारांचा बंदोबस्त करणे कोणाला शक्य होत नाही. आता ज्या डुकरांनी जिवंत माणसाचे रक्त चाखले आहे त्यांना आता तेच रक्त आवडेल असे पशु वैद्यकीय जाणकार सांगतात.
आज नागोराव रामराव कसबे रा.धनगरवाडी ता.जि.नांदेड यांनी पोलीस ठाणे नांदेड ग्रामीणमध्ये खबर दिल्याप्रमाणे त्यांचा मुलगा तुकाराम नागोराव कसबे हा मागील दोन दशकापासून टी.बी.या आजाराशी भांडत आहे. त्याचा नियमितपणे उचार सुरू असतो म्हणून त्याला दवाखान्यातील बऱ्याच कामांबद्दल माहिती आहे. 9 नोव्हेंबर रोजी त्याला उपचारानंतर घरी देण्यात आले होते. 10 नोव्हेंबर रोजी तो मी परभणीला जातो म्हणून त्याला रेल्वे स्थानक येथे मी सोडले.परंतू 11 नोव्हेंबरला सकाळी 8 वाजेच्यासुमारास पोलीस पाटील बालाजी बगडे यांचा कॉल आला आणि माझा मुलगा मरण पावलेला आहे ही बाब समजली. मी स्वत: येवून पाहिले असतांना माझ्या मुलाच्या गालावर, नाकाला, कानाला, कंबरेला अशा अनेक ठिकाणी डुकारांनी लचके तोडून त्याचे मास खाले आहे आणि त्यामुळे तो मरण पावला आहे. याबाबत नांदेड ग्रामीण पोलीसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली असून पोलीस अंमलदार पेदे अधिक तपास करीत आहेत.
नांदेड शासकीय रुग्णालयातील डुकरांचा हा वावर अत्यंत घातक आहे. तेथेच रुग्णाचे नातेवाईक जेवन करत असतात आणि त्यांच्या आजू-बाजूला डुकरे फिरत असतात.डुकरांमुळे सुध्दा संसर्गजन्य रोग पसरतात असे वैद्यकीय प्रक्रियेत मानले जाते. तरी पण शासकीय रुग्णालयात डुकरांचा वावर आणि आज डुकरांनी घेतलेला एक जीव अत्यंत गंभीर घटना आहे.
संग्रहित व्हिडिओ..