सन 2023 च्या बदल्यांमधील अनंत पोलीस अंमलदार अजूनही मुख्यालयात हजर झाले नाही

नांदेड (प्रतिनिधी)-सन 2023 मध्ये सर्वसाधारण बदल्या दरम्यान बदल्या झालेले अनेक पोलीस अंमलदार अद्याप पोलीस मुख्यालयात हजर झाले नाही म्हणून त्या संदर्भाचे एक स्मरण पत्र पोलीस अधिक्षक कार्यालयातील कार्यालय अधिक्षक एस.के.घोडजकर यांच्या स्वाक्षरीने निर्गमित करण्यात आले असून लवकरात लवकर बदली झालेल्या सर्वांना पोलीस मुख्यालयात हजर होण्यास मुक्त क रावे असे नमुद करण्यात आले आहे. यामध्ये सर्वाधिक वाहतुक शाखेतील पोलीस अंमलदार आहेत.
सन 2023 मध्ये पोलीसांच्या सर्वसाधारण बदल्या झाल्या.त्यातील बऱ्याच पोलीसांच्या बदल्या पोलीस मुख्यालय नांदेड येथे करण्यात आल्या. पण अद्याप ते पोलीस अंमलदार पोलीस मुख्यालयात हजर झाले नाही. या अगोदर सुध्दा 28 सप्टेंबर 2023 रोजी या सर्व पोलीस अंमलदारांना बदलीच्या ठिकाणी सोडण्यास सांगितले होते तरीपण अद्याप त्यांना सोडण्यात आलेले नाही .
बदल्या झाल्यानंतर पोलीस मुख्यालयात हजर न होणारे सर्वाधिक पोलीस अंमलदार शहर वाहतुक शाखेतील आहेत. त्याचा विभाग आणि आणि बदल्या झालेल्या पोलीस अंमलदारांचे बक्कल नंबर पुढील प्रमाणे आहेत. शहर वाहतुक शाखा-718, 2469, 3294, 3252, 3174, 3179, 1869, 1531, 2408, 5046, 5261, 1420, 1923, 2487, 2272, 2096, 85, 1066, 1286, पोलीस ठाणे भाग्यनगर-1303, 206, 2585, पोलीस ठाणे इतवारा-2479, 493,2832,3224, पोलीस ठाणे विमानतळ-2317,3307, पोलीस ठाणे शिवाजीनगर-882,381, पोलीस ठाणे वजिराबाद-518, पोलीस ठाणे धर्माबाद-2578,2272,2177, पोलीस ठाणे किनवट-3199, पोलीस ठाणे मुदखेड-2992, पोलीस ठाणे उमरी-599, 5270, पोलीस ठाणे उस्माननगर-3317, 2714, पोलीस ठाणे अर्धापूर-2470, पोलीस ठाणे माळाकोळी-3123, 3270, पोलीस ठाणे रामतिर्थ-3287, 101, पोलीस ठाणे मांडवी-3116, पोलीस ठाणे सोनखेड-638, पोलीस ठाणे लिंबगाव-2748, पोलीस ठाणे कंधार-27, 260,5213, पोलीस ठाणे कुंडलवाडी-237, पोलीस ठाणे तामसा-2389, पोलीस ठाणे देगलूर-5213, पोलीस ठाणे मुक्रामाबाद-3259, पोलीस ठाणे ईस्लापूर-1321, पोलीस ठाणे भोकर-5120, पोलीस ठाणे हिमायतनगर-5101, गुरुद्वारा सुरक्षा पथक-2084, 497, मोटर परिवहन विभाग-5210, 2270, एटीसी-2451, 3326, जिल्हा विशेष शाखा-2947, पोलीस नियंत्रण कक्ष-1068 आणि जलद प्रतिसाद पथक-501, 314 असे आहेत. या सर्वांना त्वरीत प्रभावाने पोलीस मुख्यालयात हजर होण्यासाठी कार्यमुक्त करावे असे कळविण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *