नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतून फरार असलेला शिक्षा भोगणारा कैदी स्थानिक गुन्हा शाखेने पुन्हा गजाआड केला

नांदेड(प्रतिनिधी)-खूनाच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेल्या कैदी सुट्टीवर आला आणि परत तुरूंगात गेला नाही. अशा एका कैद्याला स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे.
आकाश बालाजी बारसे (23) रा.पांगरी, विद्यापीठाच्या पाठीमागे हा गुन्हा क्रमांक 149/2017 जो नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल होता. त्या गुन्ह्यात आकाश बालाजी बारसेला जन्मठेपेची शिक्षा झाली होती तो. शिक्षाबंदी/ कैदी म्हणून शिक्षा भोगत होता. कारागृहातील नियमांप्रमाणे अशा कैद्यांना शिक्षा भोगत असतांना काही दिवसांची सुट्टी मिळत असते. या सुट्टीदरम्यान आकाश बालाजी बारसे घरी आला. परंतू सुट्टीचा काळ संपल्यानंतर सुध्दा कारागृहात गेला नाही. त्याबाबत नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 621/2022 भारतीय दंड संहितेच्या कलम 224 अर्थात कायदेशीर अभिरक्षेतून पळून जाणे या सदरात दाखल झाला होता.
आज 12 डिसेंबर रोजी स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर, पोलीस उपनिरिक्षक दत्तात्रय काळे, पोलीस अंमलदार विलास कदम, गणेश धुमाळ आदींनी या शिक्षा भोगणाऱ्या कैद्याला जेरबंद करून पुढील तपासासाठी नांदेड ग्रामीण पोलीसांच्या स्वाधीन केले आहे.
पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार, खंडेराव धरणे आदींनी फरार कैद्याला फिल्मीस्टाईल पाठलाग करून त्याला पकडण्याची कामगिरी केल्यासाठी स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाचे कौतुक केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *