नांदेड शहरात 500 रुपयांच्या बनावट नोटांचा सुळसुळाट?

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्यात 500 रुपयांच्या बनावट नोटांचा सुळसुळाट झाला आहे. अनेक बॅंकांमध्ये 500 रुपयांच्या बनावट नोटा आल्यानंतर बॅंक अधिकारी त्या नोटा जमा करून घेत आहेत. पण त्या नोटांची किंमत नोटा जमा करणाऱ्यांच्या खात्यावर होत नाही. कोण आणत आहे नांदेडमध्ये 500 रुपयांच्या बनावट नोटा? त्याचा शोध का लागत नाही? कोठून येतात या नोटा याचा शोध आणि बनावट नोटा वापरून देशद्रोह करणाऱ्यांविरुध्द कार्यवाही होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
नांदेडमध्ये बऱ्याच मोठ्याप्रमाणात बनावट 500 रुपयांच्या नोटांचा सुळसुळाट झाला आहे. अनेक सार्वजनिक स्थळी अशा 500 रुपयांच्या नोटा वापरण्याची पध्दत ही जुनी आहे. विशेष करून गर्दीचे पेट्रोलपंप, गर्दीचे हॉटेल, आठवडी बाजार, गर्दीच्या बसमध्ये, रेल्वे स्थानक, गर्दीची किराणा दुकाने अशा ठिकाणी बनावट नोटा चालविण्याची प्रथा पुर्वीपासूनच सुरू आहे. एक नंबरचे व्यवसायीक आपला दुकानात झालेली सर्व रोख रक्कम बॅंकेत जमा करतात. त्यांची आणि बॅंक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची चांगलीच ओळख असते आणि त ते त्यांचे मोठे ग्राहक असतात. म्हणून एखाद्या 500 रुपयांच्या बंडलमध्ये 1 किंवा 2 नोटा निघाल्या तर बॅंकेचे अधिकारी आणि कर्मचारी त्यांना परत देवून टाकतात. कारण बॅंक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना माहित असते की, त्यांच्या प्रतिष्ठाणमध्ये येणाऱ्या असंख्य लोकांपैकी बनावट नोट कोणी दिली हे प्रतिष्ठाणच्या मालकाला सुध्दा माहित नसते म्हणून त्या एक -दोन नोटा परत दिल्या जातात. परंतू 5-25 नोटा बनावट आल्या तर बॅंक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची सुध्दा पंचायत होते. ते रक्कम जमा करून घेतात. परंतू बनावट नोटांची किंमत त्या प्रतिष्ठाच्या खात्यामध्ये जमा होत नाही. अशा नोटा आरबीआयला पाठवून दिल्या जातात.
परंतू या बनावट नोटा कोठून येत आहेत?, कोण या बनावट नोटा बाजारात चालवत आहे?, त्यांचा शोध होणे आवश्यक आहे की, नाही ? नांदेड जिल्ह्यात “योगेश्र्वर’ कार्यरत आहेत आणि तरीपण अशा बनावट नोटा चालविण्याचा धंदा कोणाच्या जोरावर सुरू आहे याचा शोध होणे आवश्यक आहे की, नासही असे बरेच प्रश्न या निमित्ताने समोर येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *