नांदेड(प्रतिनिधी)-एका बसचालकाला प्रवाशी का नेत नाही असे सांगून मारहाण करणाऱ्या एका व्यक्तीविरुध्द भोकर पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.
भोकर एसटी डेपोमधील चालक रमेश नरसींग कुट्टेवाड (50) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.11 डिसेंबर रोजी सायंकाळी 5.15 वाजता ते आपली बस क्रमांक एम.एच.20 बी.एल.1268 घेवून बसस्थानकात जात असतांना मोटार सायकल क्रमांक एम.एच.26 बी.झेड.1273ही बस समोर आडवी उभी करून वसंत साहेबराव कल्याणकर रा.भोसी ता.भोकर याने तु प्रवासी का घेवून जात नाही असे बोलत शिवीगाळ करून चालकाची कॉलर धरुन थापडबुक्याने मारहाण केली आणि जिवे मारण्याची धमकी दिली. या तक्रारीनुसार भोकर पोलीसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 353, 332, 341, 504, 506 नुसार गुन्हा क्रमांक 414/2023 दाखल केला आहे. भोकरचे पोलीस निरिक्षक नानासाहेब उबाळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक दिगंबर पाटील अधिक तपास करीत आहेत.
भोकर शहरात बस चालकाला मारहाण