फायनान्स कंपनीची 11 लाख 41 हजार 345 रुपयांची फसवणूक

नांदेड(प्रतिनिधी)-भारत फायनान्शियल इन्क्युन कंपनीचे कर्जदारांकडून वसुल केलेले. 11 लाख 41 हजार 345 रुपये कंपनीत न भरता परस्पर गायब करणाऱ्या दोन जणांविरुध्द मांडवी पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.
भारत फानान्स कंपनीचे मॅनेजर आकाश अशोकराव कदम यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संदीप कोंडीबा टारपे (31) रा.धानोरा ता.किनवट आणि पंकज नंदु पवार (22) रा.पांडूर्णा शिवसाडा ता.घाटंजी जि.यवतमाळ या दोघांकडे कर्जदारांना दिलेल्या रक्कमेची वसुली करण्याचे काम होते. त्या दोघांनी कर्जदारांकडून 28 फेबु्रवारी 2022 ते 27 मे 2023 दरम्यान 11 लाख 41 हजार 345 रुपयांची कर्ज वसुली केली. परंतू ती रक्कम कंपनीत न भरता स्वत:च्या फायद्यासाठी वापरली. या तक्रारीवरुन मांडवी पोलीसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 420, 408, 34 नुसार गुन्हा क्रमांक 107/2023 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक पठाण यांच्याकडे देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *