फसवणूक झालेली 53 हजार 500 रुपये रक्कम नांदेड पोलीसांनी परत मिळवून दिली

नांदेड(प्रतिनिधी)-वधू-वर परिचय ऑनलाईन पध्दतीने करणे एका युवकाला महाग पडले आणि ऑनलाईन पध्दतीत त्याचे 35 हजार 500 रुपये गेले होते ते नांदेडच्या सायबर पोलीसांनी परत मिळवून दिले आहेत.
आशिष प्रकार सोनेकर यांनी वजिराबाद पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती की, फेसबुकवर वधू-वर परिचय करून देण्याची जाहिरात आली. त्या जाहिरातीत दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधला असता आशिष सोनेकरला काही मुलींचे फोटो पाठविण्यात आले. मुलींच्या नातेवाईकांची भेट करून देण्यासाठी वेळोवेळी 35 हजार 500 रुपये ऑनलाईन पध्दतीने घेतले. परंतू मुलींची व नातलागांची भेट होत नव्हती. त्यात टाळाटाळ केली जात होती. तेंव्हा आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर आशिष सोनेकरने तक्रार दिली.
वजिराबाद पोलीस ठाणे आणि सायबर पोलीस ठाणे नांदेड यांनी या तक्रारीची दखल घेवून संबंधीत बॅंक आणि वॉलेट यांचे नोडल अधिकारी यांना ईमेलद्वारे संपर्क साधला. बॅंकां आणि वॉलेटसोबत पाठपुरावा केल्यामुळे आशिष सोनेकरची फसवणू करण्यात आलेली रक्कम 35 हजार 500 रुपये त्यांच्या खात्यात परत जमा झाले आहेत. आशिष सोनेकर यांनी याबाबत पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांचे आभार व्यक्त केले आहेत. अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांच्या मार्गदर्शनात सायबर पोलीस स्टेशनमधील पोलीस उपनिरिक्षक दळवी, थोरवे,पोलीस अंमलदार विलास राठोड यांनी हे काम पुर्ण केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *