नांदेड(प्रतिनिधी)-एका कंत्राटदाराची गाडी अडवून अडीच लाख आणि दहा लाख रूपये खंडणी मागितल्याप्रकरणी उस्माननगर पोलिसांनी ११ जणांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
सुदाम विठ्ठलराव कुलकर्णी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ८ ऑगस्ट २०२२ रोजी रूद्राणी इन्फ्रास्ट्रक्चर लि. या कंपनीच्या वाळू आणि गिट्टी तसेच सिमेंटच्या गाड्या अडवून बळीराम येलमठवाड, गोविंद तुकाराम चिखलवाड, विकास धोंडूपंत मंदावाड, रावसाहेब कुंडलीक शिंदे, लक्ष्मण पवळे, शिरीष पवळे, गोविंद तुकाराम टिबुकवाड, बिट्टू धाडें मंंदावाड, बळीराम येलमठवाड, येनाथ शिंदे, साहेबराव बाजीराव शिंदे या सर्वांनी त्या गाड्या अडवून अडीच लाख आणि दहा लाख रूपयांची खंडणी मागितली. उस्माननगर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा १७२/२०२२ भारतीय दंड संहितेच्या कलम ३४१, ३८४, ४२७, ५११ आणि ३४ नुसार दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक केेंद्रे यांच्याकडे देण्यात आला आहे.