भरतकुमार पोपटाणीसह तुरूंगातील तिघांचे हस्तांतरण वॉरंट मंजुर 

नांदेड(प्रतिनिधी)-वजिराबाद येथे दाखल झालेला गुप्त मकोका गुन्ह्यात तुरूंगात असलेले तीन मकोकातील आरोपी हवे आहेत असा अर्ज आज अतिरिक्त सत्र न्यायाधीशांनी मंजुर केला आहे.

जवळपास 40 दिवसांपुर्वी वजिराबाद पोलीस ठाण्यात मकोका कायद्यासह गुन्हा क्रमांक 119/2023 दाखल झाला. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपअधिक्षक सुरज गुरव यांच्याकडे आहे. या प्रकरणी या गुन्ह्यातील हकीकतीनुसार रिंदाने 1 कोटीची खंडणी मागितल्यानंतर त्या खंडणीत 40 लाखांवर तडजोड घडवून आणणारा भरतकुमार धरमदास पोपटाणी (40) यास 5 जुलै रोजी अटक करण्यात आली. 6 जुुलै रोजी विशेष न्यायालयाने भरतकुमारला 14 दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे. त्यानंतर आज दुसऱ्या दिवशी सुरज गुरव यांनी न्यायालयात अर्ज केला की, अगोदरच्या मकोका गुन्ह्यात आरोपी असलेले आणि सध्या तुरूंगात असलेले इंदरपालसिंघ उर्फ सन्नी मेजर, गोलु मंगनाळे आणि जगदीप सिंघ उर्फ जग्गी संधू या तिघांचे हस्तांतरण वॉरंट हवे आहे. याचा अर्थ भरतकुमार पोपटाणी आणि हस्तांतरण वॉरंटवर मागितलेले तिन आरोपी असे चार जण गुन्हा क्रमांक 119/2023 मध्ये आरोपी होणार आहेत. पोलीसांच्या कामकाजाच्या सवडीनुसार पोलीस या तिघांना तुरूंगातुन आपल्या ताब्यात घेतील आणि न्यायालयात हजर करतील.

भरतकुमार पोपटाणी पहिल्यावेळस सुध्दा ताब्यात होता म्हणे..

बांधकाम व्यवसायीक संजय बियाणी यांच्या हत्याप्रकरणात ज्या वेळी अनेक लोकांना ताब्यात घेतले होते. त्याही वेळेस भरतकुमार धरमदास पोपटाणी हा पोलीसांच्या ताब्यात होता म्हणे.वास्तव न्युज लाईव्हच्या आठवणीप्रमाणे त्यावेळेस ताब्यात असलेल्या सर्वांनाच काही-काही अंतराने आरोपी करण्यात आले होते. परंतू भरतकुमार पोपटाणीला आरोपी करण्यात आले नाही अशी माहिती खात्रीलायक सुत्रांनी दिली आहे.

संबंधीत बातमी…

https://vastavnewslive.com/2023/07/07/रिंदाच्या-मित्राला-नांदे/

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *