नांदेड(प्रतिनिधी)-खानापूर ता.देगलूर येथे चहा पिण्यासाठी थांबलेल्या एका मालवाहू गाडीच्या चालकाला लुटणाऱ्या दोन जणांना देगलूरचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सुधीर बर्डे यांनी 12 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
सुशील शिवनारायण पवार रा.उज्जेन (मध्यप्रदेश) हे दि.7 ऑगस्ट रोजी मध्यरात्री 2 ते 2.30 वाजेच्यासुमारास खानापूर ता.देगलूर येथील एमआयडीसी जवळच्या एका हॉटेलजवळ आपली मालवाहू गाडी एच.आर.38 यु.5657 थांबवून चहा पिली.चहा पिऊन परत आपल्या गाडीकडे जात असतांना चार जणांनी त्याला पकडून शेतात नेले आणि त्यांना मारहाण करून त्यांच्या खिशातील 1200 रुपये रोख रक्कम व पाच हजारांचा मोबाईल चोरून नेला आहे.
देगलूर पोलीसंानी हा गुन्हा क्रमांक 360/2021 कलम 392, 34 भारतीय दंड संहितेनुसार दाखल केला. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक भगवान धबडगे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक रवि मुंडे यांच्याकडे देण्यात आला. देगलूर पोलीसांनी त्वरीत हालचाल करून ईस्माईल खादर साहेब शेख (35) रा.खानापूर आणि संतोष यादवराव मंगेशकर (25) रा.शेलगाव ता.देगलूर या दोघांना पकडले. आज 8 ऑगस्ट रोजी या दोघांना न्यायालयात हजर करून पोलीस कोठडी मागण्यात आली. न्या.सुधीर बर्डे यांनी या दोघांना 12 ऑगस्टपर्यंत, चार दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे. या प्रकरणातील इतर दोघांचा शोध देगलूर पोलीस घेत आहेत.
मध्यप्रदेशातील ट्रक चालकाला लुटणाऱ्या दोघांना पोलीस कोठडी