नांदेड(प्रतिनिधी)- आज महानगरपालिकेच्या नवनियुक्त स्थायी समिती सभापतीने यंदाच्यावर्षी नगर रचना विभागाच्यावतीने नोव्हेंबरपर्यंत 16 कोटी रुपयांची वसुली केली आहे. नांदेड महानगरपालिकेतील स्थायी समिती सभापती किशोर स्वामी यांनीही माहिती दिली.आज नवनियुक्ती स्थायी समिती सभापती किशेार स्वामी यांनी नगर रचना विभागासोबत आढावा बैठक घेतली. या बैठकीदरम्यान झालेल्या चर्चेनंतर मनपाने पाठवलेल्या प्रसिध्दीपत्रकानुसार आर्थिक वर्ष 2021-22 दरम्यान नोव्हेंबर महिन्यापर्यंतच 16 कोटी रुपयांची वसुल करण्यात आली आहे. यावर्षीच्या 983 संचिकांपैकी 823 संचिका निकाली काढण्यात आल्या आहेत. सन 2019-20 मध्ये 14.60 कोटी रुपये नगर रचना विभागाने मिळवले होते. साल सन 2020-21 दरम्यान 12.50 कोटी रुपये महानगरपालिकेला मिळाले होते. स्थायी समिती सभापती किशोर स्वामी यांनी नगर रचना विभागातील गैरहजर कर्मचाऱ्यांना कारण मिमांसा नोटीस देण्यास सांगितले. तसेच मागील 12 वर्षापासून नगर रचना विभागात ठाण मांडलेल्या एका कर्मचाऱ्याची तात्काळ बदली करण्यास सांगितले. नगर रचना विभाग हा महानगरपालिकेच्या उत्पन्नाचे प्रमुख साधन आहे. म्हणून या विभागाच्या कामाची गती वाढविण्याची सुचना किशोर स्वामी यांनी केली. कामात सुधारणा करा, वास्तुइशारद संचिका दाखल करताच तेंव्हा परिपुर्ण संचिकाच घ्या, त्रुटी असलेली संचिका स्विकारू नका कारण त्यामुळे कामाची गती मंदावते. या बैठकीत सहाय्यक संचालक नगररचना मनोज गर्जे, नगररचनाकार पवार यांची उपस्थिती होती.
Related Posts
सागर यादव खून प्रकरणातील 22 क्रमांकाचा आरोपी पोलीस कोठडीत
नांदेड(प्रतिनिधी)-7 नोव्हेंबर रोजी सराफा भागात सागर यादव या युवकाच्या खून प्रकरणातील 22 व्या क्रमांकाचा आरोपी इतवारा पोलीसांनी काल दि.23 नोव्हेंबर…
एस.टी. संपकरी वाहकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
संघटनेकडून 50 लाख रुपये नुकसान भरपाईची मागणी नांदेड(प्रतिनिधी)-एस.टी.विभागातील संपात सहभागी असलेल्या एका वाहकाचा आज सकाळी मृत्यू झाल्यानंतर संघटनेने नुकसान भरपाई…
एमजीएम महाविद्यालयात सोशल मिडीयामुळे घडला राडा
नांदेड(प्रतिनिधी)-समाज माध्यमांचा वापर चांगल्या बाबीचे प्रसारण करण्यासाठी अस्तित्वात आहे. पण त्याचा दुरपयोग सुध्दा तेवढाच सुरू झाला.असाच काहीसा प्रकार एमजीएम महाविद्यालयातील…