नांदेड(प्रतिनिधी) महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 13 अ मधील पोट निवडणुकीत आता तिरंगी लढत होणार आहे. इतर उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. महानगरपालिकेच्या निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांनी जाहिर केलेल्या प्रसिध्दी पत्रकानुसार नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका प्रभाग क्रमांक 13 अ चौफाळा, मदिनानगर पोट निवडणुक 2021 दरम्यान आज 9 डिसेंबर 2021 अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी चार जणांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. आता या पोट निवडणुकीमध्ये भारतीय राष्ट्रीय कॉंगे्रसच्यावतीने मुस्कान नाज सय्यद वाजिद, भारतीय जनता पार्टीच्यावतीने लक्ष्मीबाई बाबूराव जोंधळे, एमआयएमच्यावतीने रेशमा बेगम सलीम बेग असे तीनच उमेदवार शिल्लक राहिले आहेत. आता प्रभाग क्रमांक 13 अ ची पोटनिवडणुक तिरंगी लढत होणार आहे. हा प्रभाग अनुसूचित जाती महिलेसाठी राखीव आहे. पोट निवडणुकीदरम्यान 21 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे आणि मतमोजणी 22 डिसेंबर रोजी होणार आहे.
Related Posts
घराघरांनाही ओढ आता तिरंग्याची !
नागरिकीकरणामध्ये कोणतेही लोकशाहीप्रधान राष्ट्र हे नागरिकांना कायद्याने सज्ञान करण्यावर भर देत असते. शिक्षणाच्या माध्यमातून हा जबाबदार नागरिकत्वाचा पाया भक्कम होत…
गोदावरी नदीत अनोळखी 40-45 वर्ष वय असलेल्या महिलेचे प्रेत सापडले
नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड शहराच्याकडे वाहणाऱ्या गोदावरी नदी पात्रात आज दुपारी 40- 45 वर्ष वयाच्या एका अनोळखी महिलेचे प्रेत गोदावरी जिवरक्षक दलाने बाहेर…
कोरोनाचे तिसरे तांडव;शुक्रवारी दिले ७१९ नवीन रुग्ण;एक महिलेचा मृत्यू
नांदेड,(प्रतिनिधी)- आज शुक्रवारी कोरोना विषाणूने एकूण ७१९ नवीन कोरोना बाधीत रुग्ण दिले आहेत. आज उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या ३८१२ आहे.कोरोना…