नांदेड(प्रतिनिधी)-छत्रपती संभाजीनगर विभागातून नांदेड येथील विजय अशोक गिते या युवकाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत सहकार अधिकारी वर्ग-1 या पदावर आपले नाव कोरले आहे. त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
नांदेड येथील विजय अशोक गिते याने बीएससी ऍग्री ही पदवी पुर्ण करून एमपीएससी मार्फत स्पर्धा परिक्षांमध्ये भाग घेतला. ऑगस्ट 2023 मध्ये झालेल्या परिक्षांमध्ये विजय अशोक गितेची निवड खुल्या प्रवर्गातून झाली आहे. विजय गिते यांचे वडील अशोक गिते हे नांदेडमध्ये पोलीस अंमलदार होते. सध्या त्यांची नियुक्ती रिसोड जिल्हा वाशीम येथे पोलीस उपनिरिक्षक या पदावर आहे. विजय अशोक गितेने प्राप्त केलेल्या यशासाठी त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
विजय अशोक गितेचे एमपीएससी परिक्षेत यश ; सहकार अधिकारी वर्ग-1 पद प्राप्त केले