विमानतळ पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाने दोन चोर पकडले

नांदेड(प्रतिनिधी)- विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दुचाकीवर महिलांचे गंठन चोरून पळून जाणाऱ्या दोन चोरट्यांना विमानतळ पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाने जेरबंद करून त्यांच्याकडून 2 लाख 15 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.
रस्त्यावर चालणाऱ्या महिला, वयस्कर व्यक्ती यांच्याकडील साहित्य दुचाकीवर येवून बळजबरीने चोरून नेणाऱ्या घटना घडल्या आहेत. त्यात गुन्हा क्रामंक 257 आणि गुन्हा क्रमांक 386/2022 दाखल होते. या प्रकरणांना घडवणाऱ्या आरोपींचा शोध सुरू होता. विमानतळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक अनिरुध्द काकडे, गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरिक्षक बाळू गिते, पोलीस उपनिरिक्षक रविंद्र बुरकुले, पोलीस अंमलदार दारासिंग राठोड आणि बंडू कलंदर यांनी या प्रकरणात शेख तालीब शेख आरीफ (22) वर्ष रा. खडकपुरा आणि शेख अकरम शेख खलील (26) रा. खडकपुरा या दोघांना पकडले. त्यांनी गुन्हा करतांना वापरलेली 40 हजार रुपये किंमतीची दुचाकी गाडी, 2.5 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मनीमंगळसुत्र आणि 1 मोबाईल असा एकूण 2 लाख 15 हजार रुपयांचा चोरीचा ऐवज जप्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *