मराठा मोर्चा निघाल्यावर देवेंद्रजींनी वक्तव्य केले होते की “मी ब्राह्मण असल्याने माझ्यावर टीका होते”
तुम्ही स्वतःला ब्राह्मण म्हणविता, ठाकरे सरकार पाडताना तुम्ही जाहीर केले की गद्दार झालेले आमदार व सरकार पाडणे याच्याशी माझा काही संबंध नाही. आता तुम्ही जाहीरपणे मान्य करता की मी सूड घेण्यासाठी सरकार पाडले. सत्वगुणी देव योनीतील ब्राह्मण आमच्या हिंदू धर्मानुसार सत्य, क्षमा, द्वेष व सन्मानाच्या अभिलाषेपासून मुक्तता ,…… (भगवद्गीता गीता अध्याय 16,ओवी 1,2,3) असे दैवी सद्गुण असलेले भूतलावरील देव असतात व धर्मग्रंथानुसार त्यांनाच ब्राह्मण म्हटले जाते. ब्राह्मणाने त्याचप्रमाणे वर्तन करावे अशी धर्म आज्ञा आहे पण देवेंद्रजी तुमच्या वर्तनात दंभ, उरमटपणा, अभिमान ,….., हे असूरी दुर्गुण दिसतात. जो धर्मग्रंथात सांगितलेली कर्तव्य पार पाडत नाही, तसे वर्तन करीत नाही त्याला असुर असे म्हटले आहे(अध्याय 16 ओवी ओवी4). मग तुम्ही जो हिंदुत्वाचा ढोल पिटता ते कोणत्या धर्मग्रंथाच्या आधारावर? तुम्ही आमच्या हिंदू धर्मातील ब्राह्मण आहात की असुर आहात ते एकदा जाहीर करा नाहीतर आम्ही वेळोवेळी जाहीर करत राहू.
सरकार बदलण्याचे अधिकार लोकप्रतिनिधींना आहेत पण ते लोकशाही मार्गाने व काही संकेत पाळून करायचे असते. देवेंद्रजींनी सगळे लोकशाही मार्ग धुडकावून लावत आपली मनोकामना पूर्ण केली. मुळात अर्धी चड्डी ते फुल चड्डी व डोक्यावर काळी टोपी या वैचारिक प्रवासात भारतीय राज्यघटनेला थारा नाही. असा हा असुर वृत्तीचा व घटना विरोधी विचाराचा माणूस जोपर्यंत सामान्य माणसाला समजत नाही तोपर्यंत या समाजाचे व देशाचे काही खरे नाही. त्यावर पहिला उपाय म्हणजे त्यांच्या पोटातील व डोक्यातील विचार जाहीरपणे मांडणे. मग लोकांची खात्री पटेल की,
‘देवेंद्र फडणवीस हा आमच्या हिंदू धर्मातील असुरी वृत्तीचा व घटना न मानणारा एक कुटील जाणवे व शेंडी धारि राजकारणी आहे !’

लेखक:-सुरेश खोपडे