नांदेड(प्रतिनिधी)-भानामती करण्याच्या कारणावरुन एका 85 वर्षीय वृध्द इस्माचा खून करण्यात आल्याची घटना 1 मार्च रोजी मौजे गागलेगाव ता.बिलोली येथे घडली आहे.
मारोती नागनाथ पांचाळ यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.1 मार्च रोजी दुपारी 4 वाजेच्यासुमारास गागलेगाव येथे त्यांच्या घरासमोर त्यांचे नातलग हनुमंत काशीराम पांचाळ यांनी वामन डुमणे यांच्या मुलीवर करणी/ भानामती केली याची शंका घेवून त्यांनी हनुमंत काशीराम पांचाळ (85) यांना पकडून नेऊन चिंचेच्या झाडाला बांधले आणि त्यांना लाथाबुक्यांनी मारहाण करून त्यांचा जीव घेतला आहे. याप्रकरणात रामतिर्थ पोलीसांनी आरोपी या सदरात वामन डुमणे, त्यांचा मुलगा रत्नदिप डुमणे दोघे रा.गागलेगाव ता.बिलोली आणि दयानंद वाघमारे रा.कांगठी ता.बिलोली यांची नावे आरोपी सदरात लिहिली आहेत. हा गुन्हा क्रमांक 33/2023 असा असून त्यात भारतीय दंड संहितेची 302, 342, 34 जोडण्यात आलेली आहे. या प्रकरणाचा तपास रामतिर्थ येथील सहाय्यक पोलीस निरिक्षक संकेत दिघे हे करणार आहेत.
भानामती करण्याच्या कारणावरुन एका 85 वर्षीय इस्माचा खून