मुंडे कुटूंबियांवर जिवघेणा हल्याचा गुन्हा दाखल; तक्रारदारपण मुंडेच

नांदेड(प्रतिनिधी)-रामाची वाडी शिवारात तालुका लोहा येथे कोर्टाची केस परत घेण्याच्या कारणावरुन मुंडे कुटूंबियांमध्ये झालेल्या भांडणात हाणामारी झाली आहे. 9 मुंडेविरुध्द माळाकोळी पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.
हनुमंत गोविंद मुंडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 5 जुलै रोजी दुपारी रामाची वाडी शिवारात त्यांच्या भावकीतील लहु प्रल्हाद मुंडे, माधव प्रल्हाद मुंडे, अंकुश प्रल्हाद मुंडे, प्रल्हाद लक्ष्मण मुंडे, नरसींग उत्तम मुंडे, उत्तम लक्ष्मण मुंडे, बाबू उर्फ बाबूराव लक्ष्मण मुंडे, ममताबाई प्रल्हाद मुंडे, महानंदा उत्तम मुंडे या सर्वांनी मिळून हनुमंत गोविंद मुंडे यास जुन्या भांडणातील कोर्टातील केस उचलून घे म्हणून शिवीगाळ करून कत्तीने डोक्यात मारले, त्यांच्या पत्नीला मारहाण केली, त्यांच्या भावाला मारहाण केली असा प्रकार घडला.
या तक्रारीनुसार माळाकोळी पोलीसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 307, 143, 147, 148, 149, 324, 323, 504, 506 नुसार गुन्हा क्रमांक 87/2023 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक संजय निलपत्रेवार यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक आडे यांच्याकडे दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *