नांदेड(प्रतिनिधी)-शुक्रवार दि.7 रोजी सकाळपासूनच सोशल मिडीयावर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या बातमीचे पत्र वेगाने फिरले याची दखल थेट राज्य निवडणुक आयोगाने घेतली आणि लगेच काही वेळातच दुसरे प्रसिध्दी पत्रक काढून आमच्याकडून कोणत्याही निवडणुक कार्यक्रमाची घोषणा नाही असा खुलासच त्यांनी जाहीर केला.
मागील जवळपास दीड वर्षापासून राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगर पालिका, नगरपंचायत या निवडणुका घेण्यात आल्या नाहीत. यांचा कालावधी संपला असून या ठिकाणी आता प्रशासन आहे. यामुळे स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या राज्यकर्त्यांतमात्र या विषयची खदखद कायम अजूनही त्यांच्या मनात शिजत आहे. शुक्रवारी सकाळी निवडणुक आयोगाने प्रसिध्दी पत्रक काढून निवडणुकीचा कार्यक्रम येत्या ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्यात सुरू होणार असल्याची चुनूक सोडली होती. काही कार्यकर्त्यांनी मात्र हे प्रसिध्द पत्रक सोशल मिडीयावर भन्नाट फिरवल. राज्य निवडणुक आयोगातर्फे 5 जुलै 2023 रोजी स्थानिक स्वराज्य निवडणुकीसंदर्भातील मतदार यादीबाबबतची अधिसुचना प्रसिध्द केली आहे. त्यात प्रत्यक्षात कोणत्याही निवडणुक कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली नाही. यामध्ये केवळ ग्रामपंचायत निवडणुका वगळता अन्य सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीबाबत सर्वोच्च न्यायालयाने जेसे थेच आदेश दिले आहेत. यामुळे कोणत्याही निवडणुक कार्यक्रमाची घोषणाय करण्याचा प्रश्न उद्भवत नाही असे स्पष्टीकरण राज्य निवडणुक आयुक्त युपीएस मदान यांनी जाहीर केले.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदार याद्या ह्या स्वतंत्र केल्या जात नाहीत. लोकसभा आणि विधानसभा याच याद्या वापरल्या जात. यामध्ये प्रभाग निहाय याद्या केल्या जातात आणि विधानसभा तसेच लोकसभा या मतदान याद्या यासाठी वापरल्या जातात. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आगामी संभाव्य सार्वत्रिक आणि पोट निवडणुकीसाठी विधानसभा मतदार संघाच्या याद्या वापरण्याकरीता एक विशिष्ट तारीख निश्चित केली जाते. त्याच धर्तीवर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आगामी संभाव्य सार्वत्रिक आणि पोट निवडणुकीसाठी 1 जुलै ही कट ऑफ डेट निश्चित करण्याबाबतची अधिसुचना 5 जुलै 2023 रोजी प्रसिध्द करण्यात आली आहे. यामुळे राज्य निवडणुक आयोगाने कोणत्याही प्रकारच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला नाही असे स्पष्ट राज्य निवडणुक आयोग मदान यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केला आहे.
सुरूवातीच्या प्रसिध्दी पत्रकाच्या आधारे अनेक इच्छूक राजकीय उमेदवारांनी एकदाचे आता निवडणुक कार्यक्रम जाहीर झाला अशा स्वरुपात ते वावरत होते आणि प्रदीर्घ कालावधीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होत असल्याने उमेदवारांबरोबर मतदारही आप-आपले पक्ष निवडण्यासाठी सज्ज झाले होते. मात्र लगेच दुपारी राज्य निवडणुक आयोगाने दुसरे प्रसिध्द पत्रक काढून संभाव्य इच्छूक उमेदवार आणि मतदारांचा मात्र हिरमोडच केला
.