नांदेड(प्रतिनिधी)-सन 2023 च्या सर्वसाधारण बदल्यांमध्ये नांदेड जिल्ह्यातील ज्या पोलीस अंमलदारांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यांना नवीन ठिकाणी हजर होण्यासाठी आणि आताच्या कार्यरत ठिकाणावरून कार्यमुक्त करण्यासाठी पोलीस अधिक्षक कार्यालयाने अनेकदा आदेश काढले. सगळ्यात शेवटी 23 नोव्हेंबर रोजी व्हिडीओ कॉन्फरन्सींगच्या मिटींगमध्ये सुध्दा अशा बदली झालेल्या सर्व पोलीस अंमलदारांना त्वरीत कार्यमुक्त करावे असे आदेश देऊन दि.30 नोव्हेंबरपर्यंत त्यांची नावे बकल नंबर कळविण्यास सांगितले होते. पोलीस अधिक्षकांचे आदेश असतांना वजिराबादचे पोलीस निरिक्षक अशोक घोरबांड यांनी त्यास केराची टोपली दाखव आजच्या तारखेपर्यंतही एक पोलीस अंमलदार सोडलेला नाही. आता त्यासाठी पोलीस अधिक्षकांना कोण्या तरी दुसऱ्या अधिकाऱ्याला आदेश देऊन त्या पोलीस अंमलदाराची नोंद पोलीस ठाणे डायरीत अर्थात सीसीटीएनएसमध्ये करून त्याला कार्यमुक्त करावे असे सांगण्याची वेळ आली आहे.
सन 2023 मध्ये पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी अनेक पोलीस अंमलदारांच्या बदल्या केल्या. बदल्या करतांना काही अडचणी राहिल्या असतील तर त्या सुध्दा श्रीकृष्ण कोकाटे यांनी ऐकल्या आणि पोलीस अंमलदारांच्या मागणीनुसार त्यांना नवीन नियुक्ती दिली. वजिराबाद पोलीस ठाण्यात अशोक घोरबांड आल्यानंतर तेथील एका पोलीस अंमलदाराची बदली मुख्यालयात झाली. परंतू अशोक घोरबांड यांनी त्याला सोडले नाही. त्यानंतर अनेकवेळेस पोलीस अधिक्षक कार्यालयाने आदेश करून बदली झालेल्या पोलीस अंमलदारांना सोडण्यासाठी संबंधीत पोलीस ठाणे अधिकारी यांना सांगितले होते. तरी पण वजिराबादचा पोलीस अंमलदार अद्याप आपल्या बदली झालेल्या ठिकाणी अर्थात मुख्यालयात हजर झालेला नाही. तो सध्या वजिराबाद येथेच कार्यरत आहे.आता पोलीस अधिक्षकांना नवीन सोय करावी लागेल असे वाटते की, ज्या पोलीस अंमलदारांना पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांनी कार्यमुक्त केलेले नाही. त्यांना सोडण्यासाठी विशेष अधिकाऱ्याची नियुक्ती करून त्या अधिकाऱ्यामार्फत त्याची नोंद सीसीटीएनएसला करावी लागेल काय?
30 नोव्हेंबर ही शेवटची तारीख गेल्यानंतरही वजिराबादचा पोलीस अंमलदार बदलीवर सोडला नाही